कठिण काळात शहराचे पालकत्व स्विकारुन आमदार जगताप यांनी सर्वपरीने योगदान दिले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :-  कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्यांना आधार देऊन अनेक गरजू घटकातील कोरोना रुग्णांना वेळेवर उपचार, औषधे व ऑक्सिजन बेड मिळवून दिल्याबद्दल चर्मकार विकास संघ, लोकनेते मा.आमदार सितारामजी घनदाट (मामा) सामाजिक प्रतिष्ठान व रविदासीया चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजच्या वतीने त्यांचा कोरोना योध्दा सन्मानाने गौरव करण्यात आला.

चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी आमदार जगताप यांना सन्मानपत्र प्रदान केले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष बलराज गायकवाड, रविदासीया चेंबरचे संदीप सोनवणे, संजय गायकवाड, संतोष गायकवाड आदी पदधिकारी उपस्थितीत होते.

प्रदेशाध्यक्ष संजय खामकर म्हणाले की, कोरोना महामारीच्या संकटकाळात आमदार संग्राम जगताप यांनी सर्वसामान्यांना आधार देण्याचे कार्य केले. कठिण काळात शहराचे पालकत्व स्विकारुन त्यांनी सर्वपरीने योगदान दिले.

हातावर पोट असलेल्या श्रमिक कामगार कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी रेशनिंग व किराणा किटचे वाटप केले. ग्रामीण भागातून शहरात उपचारासाठी असलेल्या कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना भोजनाची व्यवस्था केली. अनेक गरजू रुग्णांना रुग्णालयात बेड व लागणारी अत्यावश्यक औषधे उपलब्ध करुन दिले.

शहराची परिस्थिती गंभीर असताना सर्वसामान्यांना उपचार मिळण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. जनतेच्या संकटकाळात मदत करणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe