आमदार जगताप म्हणतात यामुळे शहरात व्यवसायवृध्दीला चालना

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-शहरविकासाला चालना देण्यासाठी मी महापौर व आमदार पदाच्या माध्यमातून राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना मंजूर केल्या असून, विकास आराखडयानुसार नियोजनपुर्वक कामे सुरु आहेत.

अनेक वर्षांचा विकासाचा अनुशेष  बाकी आहे. टप्प्या टप्प्याने मुलभूत प्रश्नाबरोबर विकासाचे प्रश्न मार्गी लावणार आहे. शहराची विकासाकडे वाटचाल सुरू असल्याने व्यवसाय धंदयासाठी पोषक वातावरण निर्माण होत असून त्यामुळे शहराच्या आर्थिक विकासाला चालना मिळत आहे.

असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. प्रभाग क्र. ११ चे नगरसेवक अविनाश घुले यांच्या प्रयत्नातुन पुनम मोती नगर परिसरातील सुमारे ७४ लाख रुपये खर्चाच्या अंतर्गत डांबरी  रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ आ संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. आ.जगताप पुढे म्हणाले की, नगरसेवक अविनाश घुले हे नेहमीच जनतेच्या संपर्कात राहून विकास कामांसाठी पाठपुरावा करत असतात.

महावितरण कार्यालय ते कानडे मळा ते सोलापूर रोड या रस्त्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबीत आहे. या संपूर्ण रस्त्याचा काँक्रीटीकरणाचा प्रस्ताव शासन दरबारी दाखल असून त्यास लवकरच मंजूरी मिळणार असल्याचे आ. जगताप यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe