अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :- कोरोनावर मात करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार घालून श्रीरामपुरचे आमदार लहू कानडे यांनी कामाकाजाला सुरुवात केली.
शिवाजीनगर परिसरातील काँग्रेस कार्यकर्ते तसेच व्यावसायिक यांच्या वतीने त्यांचा सत्कार आयोजित केला होता. त्यापूर्वी आमदार लहू कानडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज याच्या पुतळ्याला हार अर्पण करत कामकाजाचा श्रीगणेशा केला.
यावेळी माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, साई आर्दश मल्टीस्टेसचे अध्यक्ष शिवाजी कपाळे, स्वामी समर्थ संगणक सेंटर व्यवस्थापक योगेश आंबेडकर,
नगरसेवक आदिनाथ कराळे, सुनील विश्वासराव, पत्रकार शिवाजी घाडगे, विजय भोसले, योग शिक्षक किशोर थोरात, ललित चोरडिया, मुन्ना देसर्डा, आबासाहेब वाळुंज, विलास मुसमाडे आदींनी आमदार लहू कानडे यांचा सत्कार केला.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved