निधी प्रकरणावरून आमदार लंके यांची प्रवीण दरेकरांवर टीका

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावांनी ग्रामपंचायती निवडणुका बिनविरोध कराव्यात, त्यांना २५ लाखाचा निधी बक्षिस म्हणून देऊ, अशी घोषणा आमदार लंके यांनी केली होती.

याबाबत दरेकर यांनी वक्तव्य करून असा निधी मिळणे शक्य नाही, असे म्हटले होते. त्याला आमदार लंके यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.

यावेळी बोलताना लंके म्हणाले कि, `दरेकर साहेब बोलण्याआधी जरा ग्रामीण भागातील राजकारण अनुभवावे. गावासाठी निधी मिळविण्यासाठी अनेक मार्ग आहेत.

त्यांना आमदार असूनही निधीबाबत माहितीच नाही, अशा शब्दांत आमदार निलेश लंके यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना फटकारले.

गावातील सदस्य, सरपंचापासून ते सर्व निवडणुका मी लढविल्या आहेत. त्यामुळे मला सर्व गोष्टी माहिती आहेत. गावातील प्रश्न वेगळे असतात. शहरातील वेगळे असतात.

ग्रामीण भागातील राजकारण त्यांना कळण्याचे कारण नाही. तुम्ही आधी ग्रामीण भागातील राजकारण समजावून घ्या. तुम्ही गावाकडे फिरा म्हणजे तुम्हाला समजेल, की राजकारणातून खूनही पडू शकतात.

हे होऊ न देण्यासाठी ग्रामपंचायती बिनविरोध होणे आवश्यक असते. तसेच पुढे बोलताना आमदार लंके म्हणाले, की आमदारांना चार ते पाच कोटींचा वर्षभरात निधी मिळू शकतो.

आमदारांना निधीसाठी २५-१५ हेड असते. त्यातून विविध कामांसाठी पैसे घेता येतात. ३०-३४ हेडमधूनही अनेक कामे करता येतात. नाविण्यपूर्ण ही योजनाही अनेक निधीसाठी वापरता येते.

असे अनेक मार्ग आहेत. की ज्यातून पैसे मिळू शकतात. कोणत्या कामासाठी कोणते हेड वापरायचे, हे समजावून घ्यावे लागते. असे लंके म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment