अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- युवक हा देशाचा आधारस्तंभ आहे. या युवकांना योग्य दिशा दिल्यास ते आपल्या कार्यकर्तुत्वाने विविध क्षेत्रात वेगळा ठसा उमटवतात हे आजच्या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून दिसून येत आहे.
पक्षीय काम करत असतांना समाजातील अडीअडचणी आणि प्रश्न समजावून घेऊन ते सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे काम उत्कृष्ट आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबरोबरच सामाजिक क्षेत्रात ते कार्यरत आहेत,
असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस गौरव नरवडे यांच्या वाढदिवसानिमित्त खातगाव टाकळी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आमदार लंके बोलत होते. कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष गजानन भांडवलकर, सभापती सुदाम पवार, सरपंच राहूल झावरे, कार्याध्यक्ष विशाल म्हस्के, जिल्हा शिक्षक बँकचे माजी चेअरमन रा. वि. शिंदे, सरपंच सुनील नरवडे,
गणेश कळमकर, दत्तात्रय कुलट, राजु पादिर, सुदाम शिंदे, दादा शेख, सचिन नरवडे, अनिल नरवडे, अंकुश शेळके उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष भांडवलकर म्हणाले, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रिया, फी, परीक्षा संदर्भात येणाऱ्या अडचणी वेळोवेळी पाठपुरावा करुन सोडवल्या आहेत.
पक्षीय पातळीवरुन मार्गदर्शन व सहकार्य मिळत आहे. विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी चांगले काम करत असून, पुढील काळातही असेच उपक्रम राबवले जातील, असे सांगितले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved