अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरात हजारो कोरोना बाधितांवर मोफत उपचार करणाऱ्या आमदार नीलेश लंके यांची सर्वसामान्यांचा हक्काचा माणूस अशी ओळख राज्यात निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी शेगाव येथे बोलताना केले.
कोरोना संसर्गाच्या कालावधीत केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल शेगाव येथे मंत्री शिंगणे, आमदार लंके तसेच वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मंत्री डॉ. शिंगणे बोलत होते.
डॉ. शिंगणे म्हणाले, कोरोना कळात अनेक आमदारांनी काम केले. मात्र, २४ तास काम करणारे नीलेश लंके हे एकमेव आमदार आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, याचा वेगळा आनंद मला आहे.
निवडणुकीत आपण सगळे एकमेकांविरोधात लढतो. मात्र शरद पवार यांना अभिप्रेत असणारे शाहू, फुले, आंबेेडकर यांच्या विचारधारेला अनुसरून आमदार लंके काम करीत आहेत. त्यांच्या कामाची दखल राज्याने, देशाने व जगाने घेतली आहे, असेही मंत्री डॉ. शिंगणे म्हणाले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम