केंद्र व राज्य शासन सर्वसामान्यांसाठी व जनतेच्या फायद्यासाठी विविध शासकीय योजना जाहीर करत त्या योजना लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम स्थानिक आमदारांचे आणि खासदारांच्या असते. आज आमदार मोनिकाताई राजळे यांच्या यंत्रणेच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या दोन्ही तालुक्यातील एक लाख तीस हजार महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वत्र यंत्र राबवून त्यांचे अर्ज भरून घेतले.
आज त्या महिलांना आतापर्यंत साडेसात हजार रुपये मिळाले आहेत या माध्यमातून या तालुक्यात एक कोटी रुपये आले आहेत. अशा विविध योजना त्यांनी आपल्या काळात राबवल्या आहेत. त्यामुळे याचा फायदा निश्चितच त्यांना तिसऱ्यांदा निवडून आणण्यात होईल असा विश्वास गुजरातचे आमदार भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय प्रतिनिधी व मतदार संघाचे समन्वयक महेश कासवाल यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की पक्षाने मला आजपर्यंत देशातील विविध राज्यामध्ये गेली बारा निवडणुकीत निरीक्षकाची जबाबदारी दिलेली आहे. या भागाचे नेतृत्व करीत असलेल्या आमदार राजळे या शांत संयमी नेतृत्व आहे आणि असे नेतृत्व जनतेला हवे असते त्यामुळे मतदारसंघांमध्ये राजकीय वातावरण राहता सामाजिक सलोखा निर्माण होतो.
त्याचबरोबर महिला असल्यामुळे प्रश्न सोडून घेण्यामध्ये त्या पुढे असतात मी आल्यानंतर त्यांच्या कार्याचा आढावा घेतला त्यावेळी त्यांचे काम पाहून थक्क झालो. आज एवढे मोठे काम त्यांनी ग्रामीण भागामध्ये उभे केले आहे. कामापुढे जनता जातीचा विचार करत नाही हा माझा अनुभव आहे. प्रत्येक राज्यामध्ये निवडणुका आले की जातीचे समीकरण राजकारण सुरू होते. ते तुमच्याकडे पण दिसले आहे
मात्र त्याचबरोबर जे नेतृत्व शांत संयमी असते ते समाजामध्ये अनंतकाळ टिकते समाजामध्ये सलोखा निर्माण करते आणि हेच महत्त्वाचे असते समाजातील शेतकरी संपन्न झाला पाहिजे. व्यापार वाढला पाहिजे. व्यापाऱ्यांना संरक्षण मिळाले पाहिजे. लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. या सर्वांच्या गोष्टींचा विचार हा लोकप्रतिनिधीला करावा लागतो.मी या भागातील सर्वसामान्य जनतेपासून सर्व घटकाच्या लोकांच्या बैठका घेतल्या यामध्ये असे दिसून आले की सर्व स्तरातून आमदार राजळे यांना पाठिंबा मिळत आहे.
भारतीय जनता पार्टी ही आता देशातील मोठा पक्ष झाला आहे पक्ष उमेदवारी देताना सर्व गोष्टींचा विचार करतो आता तर पंतप्रधान मोदी, अमित शहा, जे.पी नड्डा यांनी प्रत्येक निवडणुकीतील प्रत्येक मतदारसंघात जातीने लक्ष दिले आहे. मोठ्या प्रमाणात प्रतिनिधी प्रत्येक मतदारसंघात आले आहे. अहवालात या मतदारसंघात आमदार राजळे यांचा विजय होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.