अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- तालुक्यासाठी विकास कामे महत्वाची आहेत. ज्यांचे अस्तित्व संपले, ज्यांची राजकीय दुकाणदारी संपली त्यांच्याविषयी काय बोलणार असा
सवाल करीत आमदार नीलेश लंके यांनी जि. प. चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्यावर अप्रत्यक्ष टिका केली. कोहकडी येथे ४८ लाख रूपये खर्चाच्या विविध विकासकामांचा आ. लंके यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
त्यावेळी ते बोलत होते. माजी सभापती सुदाम पवार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आ. लंके म्हणाले, देशात सध्या कोरोनावर मात करण्यासाठी यंत्रणा गुंतलेली आहे. गावागावांमध्ये विकास कामांची मागणी होत आहे.
नगर तालुक्यातील साकळाई योजना, के के रेंज, राळेगणसिद्धी पाणी योजनांबाबत अनेक घोषणा झाल्या मात्र त्या हवेत विरल्या. हे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण पाठपुरावा सुरू केला असून
देशाचे नेते शरद पवार यांच्या माध्यमातून हे प्रश्न मार्गी लावले जातील. ज्या भागात विकास कामे पोहचली नाहीत अशा ठिकाणी विकास कामे पोहचविण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत.
विविध गावांमधील विकासकामांचा आराखडा तयार आहे. येत्या काही दिवसांत विकास कामे सुरू झालेली दिसतील. काही लोक पत्रकार परिषद घेउन विकास कामांच्या वल्गना करतात.
त्यांची दुकाणदारी आम्ही बंद केली आहे. ज्यांचे अस्तीत्वच संपले आहे त्यांची दखल घेण्याची, त्यांच्याविषयी बोलण्याची गरज नसल्याचे सांगत आ. लंके यांनी सुजित झावरे यांच्यावर आ. लंके यांनी टिका केली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved