‘त्या’ आंदोलनाला आमदार राधाकृष्ण विखे यांनी दिला पाठिंबा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :-कोरोना संकटात विवाह सोहळ्यांवर आलेल्या निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर अडचणीत सापडलेल्या व्यावसायिकांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आमदार राधाकृष्ण विखे यांनी पाठिंबा दिला.

विवाह समारंभ, तसेच अन्य कार्यक्रमांवर घातलेल्या बंधनामुळे लॉन्स, मंगल कार्यालये, केटरिंग व्यावसायिक, डेकोरेटर्स, छायाचित्रकार, बँडपथक असे छोटे-मोठे व्यावसायिक अार्थिक संकटात सापडले आहेत.

यासंदर्भात अहमदनगर जिल्हा मंडप लाईट फ्लॉवर डेकोरेटर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार विखेंची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. निर्बंध शिथिल करून शासनाने या व्यावसायिकांना दिलासा देण्याची गरज आमदार विखे यांनी व्यक्त केली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment