अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला देशभरातून विरोध सुरू झाला आहे. मात्र, कांद्याचे भाव वाढल्याने सामान्य ग्राहकांना फटका बसू नये, यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येते.
यावर कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारला वेगळा उपाय सुचविला आहे. सरकारला सामान्यांना दिलासा द्यायचा असेल तर कांदा नियंत्रित करण्याऐवजी वाढलेले पेट्रोल-डिझेलचे दर कमी करावेत,
अशी सूचना पवार यांनी केली आहे. या प्रश्नावर पवार यांनी आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, सामान्य जनतेला महागाईचा फटका बसायला नको या मताचा मी देखील आहे,
पण यासाठी शेतकर्याचा बळी देणे चुकीचे ठरेल. सध्या पेट्रोल-डिझेलवर केंद्राने वाढवलेल्या करामुळे पेट्रोल डिझेलच्या किंमतींमध्ये ऐतिहासिक वाढ झाली आहे.
केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील करांमध्ये थोडी जरी कपात केली तरी वाहतूक खर्च कमी होऊन व्यापारी वर्गासह सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो.
’ कांदा निर्यातीवर बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगून पवार यांनी म्हटले आहे. लॉकडाऊन काळात संपूर्ण अर्थव्यवस्था बंद असताना
शेतकर्यांनी कष्ट करून शेतात राब राब राबत कृषी अर्थव्यवस्था सुरू ठेवली. जनतेला भाजीपाला तसेच कृषी उत्पादनांची कमतरता भासू दिली नाही.
त्यामुळे आरोग्य यंत्रणा, पोलिस यंत्रणा यांच्याप्रमाणे शेतकरी देखील करोना योद्धे आहेत. शेतकर्यांनी शेतात घाम गाळला नसता तर उणे 23 टक्के घसरलेला जीडीपी उणे 30 टक्क्यांच्याही खाली गेला असता. किमान याची तरी केंद्र सरकारने जाण ठेवायला हवी.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved