आ.रोहित पवारांनी पंतप्रधानांकडे केली ‘ही’ मागणी !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :-  27 वर्षांमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय अतिरेकी दाऊद इब्राहिम कराचीतच असल्याची कबुली अतिरेक्यांचे आश्रयस्थान असलेल्या पाकिस्तानने दिली आहे.

यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दाऊदला कोणत्याही परिस्थिती भारताच्या भूमित आणा अशी मागणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे.

आमदार रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “दाऊद इब्राहीम कराचीत असल्याचे पाकिस्तानने कबूल केले आहे. त्याला भारतात आणण्यासाठी सर्वोत्तोपरी प्रयत्न करा, अशी मी पतंप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करतो.

दाऊदला कुठल्याही परिस्थितीत भारतात आणा.” दहशतवादाच्या फंडिंगवर नजर ठेवणारी संस्था एफएटीएफच्या ‘ग्रे लिस्ट’मधून बाहेर येण्यासाठी पाकने 88 अतिरेकी संघटना व त्यांच्या म्होरक्यांवर कारवाईचे ढोंग केले आहे.

याच यादीत दाऊदचे नाव आहे. मुंबईमध्ये १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचा आरोप असलेला व संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने तयार केलेल्या

जगभरातील ८८ दहशतवाद्यांच्या यादीत असलेला दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याचे कळल्याने आ. रोहित पवार यांनी ही मागणी केली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment