आमदार रोहित पवारांना मिळाला हा पुरस्कार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :-आपल्या कार्य कुशलता व जनमानसात आपली एक वेगळी प्रतिमा निर्माण करणारे कर्जत- जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित पवार हे आपल्या कार्यामुळे नेहमीच चर्चेत राहतात.

नुकताच रोहित पवार यांचा ‘युवा नेतृत्व’ पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. फक्त बेभान होऊन आयुष्य जगणारी ती तरुणाई हा समज पूर्णपणे खोडून काढत समाजात अनेक तरुण असे काम करत आहेत की त्यामुळे आपण प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकत आहोत. अशा कृतिशील तरूणाईच्या शिरपेचात झी युवाने युवा सन्मान पुरस्कारांचा तुरा खोवला आहे.

विविध क्षेत्रात उल्लेखनीय आणि अनुकरणीय कार्य करणार्‍या युवकांना ‘झी युवा सन्मान’ पुरस्कार जाहीर झाले आहेत. हा कार्यक्रम झी युवावर शनिवार 14 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 आणि संध्याकाळी 7 वाजता दाखवण्यात येईल. या पुरस्कार सोहळ्यात युवा नेतृत्व हा सन्मान आमदार रोहित पवार यांना देण्यात आला आहे.

राजकारणापेक्षा समाज-कारणाचं बाळकडू रोहित यांना मिळालं ते आपल्या आजोबांकडून अर्थात शरद पवार यांच्याकडून. महाराष्ट्राच्या राजकारणाला रोहित यांनी अक्षरशः वाहून घेतलं.

म्हणूनच अवघ्या 21 व्या वर्षी बारामती ग्रोच्या मुख्य कार्यकारी संचालकपदाची सूत्रे समर्थपणे हाती घेतलीत आणि 2017मध्ये तळागाळातील लोकांचे प्रश्न समजून त्यांची उत्तरे शोधावी यासाठी शिरसुफळ गुळवडी मधून जिल्हा परिषदेची निवडणूक यशस्वीपणे लढवली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment