आमदार संग्राम जगताप म्हणाले ‘त्या’साठी सरकारकडे आग्रह धरणार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- अत्याधुनिक वैद्यकीय सुविधाचा खर्च अलिकडे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडत नाहीत. अशावेळी स्वस्त जेनेरिक औषधे उपलब्ध झाल्यास त्यातून रुग्णांना उपचार घेणे सोपे होईल.

राज्यातील प्रत्येक रुग्णालयातील मेडिकल स्टोअर्समध्ये जेनेरिक औषधे ठेवावीच लागतील, असा कायदा करण्यासाठी सरकारकडे आग्रह धरणार असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.

पाइपलाइन रस्त्यावरील जेनेरिक प्लस फार्मसी कंपनीच्या वतीने सोमेश्वर मेडिकलमध्ये स्वस्त औषधी दालनाचे उद्‌घाटन करताना ते बोलत होते.

महापालिकेतील विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, सभागृह नेते मनोज दुल्लम, नगरसेवक दीपाली बारस्कर, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, निखिल वारे, सुरेश आघाव,

जेनेरिक प्लस फार्मसीचे विभागीय व्यवस्थापक रवी जाधव, जिल्हा वितरक प्रताप जगताप व सुजय जगताप यावेळी उपस्थित होते.

जेनेरीक प्लस फार्मसी कंपनीचे रवी जाधव यांनी औषधांची माहिती दिली. प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल लांडगे यांनी केले. “सोमेश्वर’च्या संचालिका स्नेहल चेमटे यांनी आभार मानले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe