कार्यकर्त्यांची ‘ती’ मागणी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केली मान्य !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :-  शेतकऱ्यांच्या मालकीचा असलेल्या राहुरीच्या डाॅ. तनपुरे सहकारी साखर कारखान्यावर तालुक्याची आर्थिक जडणघडण अवलंबून असल्याने कधीही राजकारण न करता मदत करण्याची भूमिका घेतली,

असे प्रतिपादन माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त राहुरीच्या डाॅ. तनपुरे साखर कारखाना परिसरात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी भाजपाचे प्रांतिक कार्यकर्ते लक्ष्मण सावजी होते. कर्डिले म्हणाले, आर्थिक संकटात सापडल्याने साखर कारखान्याची परिस्थिती बिकट झाली होती.

या काळात आडकाठी न आणता जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्जाचे पुर्नगठण तसेच शासन पातळीवर मदत केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रूग्णांना आरोग्य सेवा मिळण्यावर राहुरी तालुक्यात मर्यादा आल्या असल्याने

रूग्णांची ससेहोलपट सुरू आहे.तातडीने उपचार मिळण्यासाठी या भागात कोविड सेंटर उभे करण्यासाठी मदत करण्याची उपस्थित कार्यकर्त्यांची मागणी कर्डिले यांनी मान्य केली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment