अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :- जिल्ह्यात संघटीत गुन्हे करणारा श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव येथील कुख्यात गुन्हेगार शंभ्या उर्फ शंभु कुंज्या चव्हाण याच्यासह त्याच्या टोळीतील ६ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.(Shrigonda News)
विशेष पोलिस महानिरीक्षकांनी तशी परवानगी दिली आहे. जिल्हयातील विविध गुन्हेगारांची माहिती संकलीत करून ज्या संघटीत गुन्हेगारी टोळ्या आहेत. त्यांच्याविरुध्द मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्याचे संकेत दिले होते.
त्या अनुशंगाने बेलवंडी, श्रीगोंदा, शिरुर, पारनेर पोलीस ठाण्यात शंभ्या उर्फ शंभु कुंज्या चव्हाण (वय २८ वर्षे, रा.सुरेगाव, ता.श्रीगोंदा), याच्यासह राजु जावेद चव्हाण, घड्याळ्या हिरामण चव्हाण, रेबीन घड्याळ्या चव्हाण,
ओंकार कुंज्या चव्हाण( सर्व रा.सुरेगाव ता.श्रीगोंदा), बाबुश्या चिंगळ्या काळे (वय २० वर्षे,रा.वांगदरी ता.श्रीगोंदा), जितेंद्र रॉकेट चव्हाण (वय २५ वर्षे, रा.पढेगाव ता.श्रीरामपुर) या सहा जणांवर दरोडा टाकणे, जबरी चोरी करणे,
घातक शस्त्रासह जबरी चोरी करणे, घरफोडी करणे, दरोड्याची तयारी करणे, जबरी चोरी करणे, घरफोडी करणे,फसवणूक करुन दरोडा टाकणे अशा स्वरुपाचे गुन्हे कट करुन दशहत निर्माण करुन केलेले नुकसान यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत.
त्यामुळे सदर टोळीविरुध्द मोक्का कायद्याअन्वये कारवाई करण्यासाठी मोक्काचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठवला होत.त्यास नुकतीच परवानगी देण्यात आली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम