Ahmednagar News : राज्यात ३१ ऑगस्टपर्यंत पावसाचे प्रमाण मध्यम राहणार आहे. यात मध्य महाराष्ट्रातील १० आणि मराठवाड्यातील ८ अशा १८ जिल्ह्यांचा समावेश राहणार आहे.
नगर, नाशिक, नंदूरबार, छत्रपती संभाजीनगर, सातारा आणि सांगली या मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यात पुढील चार दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. अशी माहिती भारतीय हवा हवामान विभागातील सेवानिवृत्त ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
मध्य प्रदेशातील चक्रीय स्थितीमुळे मध्यम महाराष्ट्रात चार ते पाच जिल्ह्यात जोदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. ही स्थिती ३१ जुलैपर्यंत राहणार आहे. १ ते ४ ऑगस्टमध्ये राज्यातील काही जिल्ह्यात दमदार पाऊस होणार असे देखील ते म्हणाले.
मध्य महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाच्या पडणाऱ्या प्रदेशातील वाऱ्यामुळे पावसाला मध्य साऊथ-इस्ट तयार झालेली चक्रीय स्थिती कारणीभूत आहे. यामुळे सध्या विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसत आहे.
नगर, नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील घाट माथ्यावर पावसाचे प्रमाण अधिक असून या भागातील ३० टक्के भूभाग हा सह्याद्रीच्या कुशीतील आहे. यामुळे याठिकाणी पावसाचे प्रमाण अधिक आहे.
दुसरीकडे नगर जिल्हा पर्जन्यछायेत असल्याने सध्या पडणाऱ्या पावसात असमानता आहे. राज्यात त्यानंतर १ ते ४ ऑगस्टदरम्यान पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. असे देखील त्यांनी सांगितले.