शेवगाव : विधानसभा निवडणुकीत आमदार मोनिका राजळे यांना सोडून इतर कोणालाही उमेदवारी द्या, त्या उमेदवाराला आम्ही निवडून आणू असे म्हणत, बोधेगाव येथे झालेल्या मेळाव्यात भाजप कार्यकर्त्यांनी ‘राजळे हटाव’चा नारा दिला.
या वेळी कार्यकर्त्यांनी कडवट भाषेत राजळेंवर टीका केली. पंकजा मुंडे यांना भेटून उमेदवार बदलण्याची मागणी करण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात आला आहे. मेळाव्यामुळे शेवगाव तालुक्यातील भाजप अंर्तगत खदखद उफाळून आली असून राजळे यांच्या समोरील अडचणींमध्ये वाढ झाल्याचे मानले जात आहे.
येत्या काही दिवसांत या मागणीसाठी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना भेटून राजळे यांना उमेदवारी न देण्याची मागणी करण्याचा निर्णयही या बैठकीत एकमुखाने घेण्यात आला. माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन काकडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बोधेगाव येथे राजळे विरोधकांचा मेळावा घेण्यात आला होता.