पेन्शनच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांचा मोर्चा

Ahmednagarlive24
Published:
Anganwadi Job Maharashtra News

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :- सेवा समाप्तीनंतर दरमहा पेन्शन मिळावी, या प्रमुख मागणीसाठी अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचारी युनियनच्या वतीने शुक्रवारी श्रीरामपूर पंचायत समितीमधील एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या प्रकल्प कार्यालयावर निदर्शने करून निवेदन देण्यात आले.

यावेळी युनियनचे सरचिटणीस कॉम्रेड राजेंद्र बावके म्हणाले, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीतर्फे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीनंतर दरमहा पेन्शन योजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला आहे.

या प्रस्तावानुसार पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी संघटनेने गेली अनेक वर्षांपासून शासनाकडे केली आहे. शासनाने सकारात्मक आश्वासने देऊनही त्याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही.

त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर तालुका प्रकल्प स्तरावर आंदोलने केली जात आहे. सरकारने याबाबत निर्णय घेऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा; अन्यथा भविष्यात यापेक्षाही तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला.

सध्या तीस वर्षे सेवा झाल्यानंतर अंगणवाडी सेविका निवृत्त झाल्यावर एकरकमी एक लाख व मदतनीस यांना ७५ हजार रुपये दिले जातात.

सध्या मिनी अंगणवाडी सेविका यांना ५६७५ व सेविका यांना ८ हजार व मदतनीस यांना ४७७५ मानधन मिळते. त्याच्या निम्मी रक्कम पेन्शन मिळावी, अशी मागणी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment