अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- राज्य निवडणूक आयोगाने १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. १५ जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. त्यासाठी २३ डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती.
दरम्यान अकोले तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतच्या निवडणुकीत आज शेवटच्या दिवशी तब्बल ७५७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असुन ५२ ग्रामपंचायतीत एकुण ११५३ उमेदवारांनी अर्ज आले असून

आता ४ जानेवारी रोजी माघारीची शेवट असल्याने त्यानंतर निवडणूक लढतीचे चिञ स्पष्ट होईल. अकोले तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे.
येत्या १५ जानेवारी रोजी ५२ ग्रामपंचायतीचे मतदान होत असुन अकोले तहसिल कार्यालयात २३ डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली होती.
२४ डिसेंबरला ११ व २८ डिसेंबरला ७३, तसेच मंंगळवार २९ डिसेंबरला ३१२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते, तर काल शेवटच्या दिवशी बुधवारी सायंकाळपर्यत ७५७ अर्ज दाखल झाल्याने आता ५२ ग्रामपंंचायतीत एकुुुण ११५३ उमेदवारांनी आपले अर्ज भरले आहेत.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserve