या तालुक्यातील अर्ध्याहून अधिक गावे झाली कोरोनामुक्त

Published on -

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे. तसेच जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी रेट देखील सुधारतो आहे.

यामुळे जिल्हावासीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. यातच जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.

कोरोनाच्या सुरुवातीला जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांची वाढ होणाऱ्या तालुक्यांमध्ये अग्रेसर असलेल्या संगमनेर तालुक्यामधील अर्ध्याहून अधिक गावे आता कोरोनामुक्त झाली आहे. जिल्हा मुख्यालयानंतर सर्वाधीक रुग्ण आढळणार्‍या संगमनेर तालुक्यात गेल्या आठ दिवसांत दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.

वैद्यकीय जाणकारांच्या अंदाजानुसार ऑक्टोबर हिटमध्ये कोविडचा प्रादुर्भाव आणखी खालावत जावून 15 नोव्हेंबरपर्यंत संगमनेर तालुका कोविड मुक्त होण्याचीही शक्यता यातून निर्माण झाली आहे. मात्र तो पर्यंत नागरिकांनी नियमांचे पालन करण्याची गरज आहे.

आजच्या स्थितीत तालुक्यात अवघे 330 रुग्ण सक्रीय असून रुग्ण बरे होण्याचा तालुक्यातील वेगही आता 91 टक्क्यांवर पोहोचला आहे. संगमनेर तालुक्यातील 45 गावांमध्ये आजच्या स्थितीत एकही सक्रीय संक्रमित रुग्ण नाही ही अत्यंत दिलासादायक बाब आहे.

एकंदरीत आजच्या स्थितीत शहरासह तालुक्यात दररोज सापडणार्‍या रुग्णवाढीला काहीसा ब्रेक लागल्याचे दिसून येत असून संक्रमित झालेली व्यक्ती यशस्वीपणे उपचारही पूर्ण करीत असल्याचे दिलासादायक चित्र दिसत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe