मोटरसायकल व ट्रॅक्टरची धडक, मोटरसायकलस्वार ठार

Published on -

अहमदनगर Live24 ,10 जून 2020 :  राहुरी तालुक्यात ट्रॅक्टर व मोटरसायकल अपघातात एका तरूणाचा मृत्यू, तर दुसरा गंभीर जखमी झाला. जखमीला नगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राहुरी रेल्वेस्थानकाजवळ मंगळवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास मोटरसायकल व ट्रॅक्टरची धडक होऊन पंकज जाधव (वय १९) व सूरज आढाव (वय १८, मानोरी) हे दोन मित्र गंभीर जखमी झाले.

जखमींना ग्रामीण रूग्णालयात नेण्यासाठी ग्रामस्थांनी मदत केली. मात्र, नगरला हलवण्याचा सल्ला ग्रामीण रूग्णालयातील डाॅक्टरांकडून मिळाला. पंकजची प्राणज्योत रस्त्यातच मालवली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News