अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या आई ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांच संगमनेरमध्ये कोरोनानं निधन झालं होतं.
आता त्यांच्यापाठोपाठ त्यांच्या थोरल्या कन्या अनिता आणि नातू अभिजीत यांचंही कोरोनानं निधन झालं आहे. काही दिवसांपूर्वी खेडकर कुटुंबियांतील जवळपास 8 सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. अशातच कुटुंबातील अनेकजण कोरोनामुक्त होऊन घरी परतले होते.
परंतु, अवघ्या आठ दिवसांत खेडकर कुटुंबियांनी तीन जणांना गमावलं आहे. सर्वात आधी ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांच 25 मे रोजी निधन झालं.
त्यापाठोपाठ त्यांच्या थोरल्या कन्या आणि नातवाचं कोरोनामुळं निधन झालं. त्यामुळे खेडकर कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आठ दिवसांत तिघांचं कोरोनामुळे निधन झाल्यानं सर्वच स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. आपल्या अदाकारीने तमाशा जिवंत करणाऱ्या ज्येष्ठ वगसम्राज्ञी, मर्दानी पोवाडा गाणारी तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचं 25 मे रोजी कोरोनाने निधन झालं.
त्या 82 वर्षाच्या होत्या. प्रसिद्ध तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या त्या मातोश्री. कांताबाई यांचे देहावसान होण्यापूर्वी पाच दिवस अगोदर त्यांच्या सर्वात ज्येष्ठ कन्या अनिता उर्फ बेबीताई कोरोनाने गेल्या होत्या.
कांताबाई सातारकर आणि तुकाराम खेडकर या दोन महान कलाकारांची ज्येष्ठ कन्या म्हणजे अनिताताई. आता कांताबाईंच्या निधनाला अवघा आठवडाही होत नाही, तोच नातवालाही काळाने हिरावून घेतले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम