मंदिरासमोर घंटा व थाळी वाजवून आंदोलन, राज्यातील सर्व मंदिरे व धार्मिक स्थळ उघडण्याची मागणी

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :- राज्यातील सर्व मंदिरे व धार्मिक स्थळ उघडण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी अहमदनगर शहर व जिल्ह्याच्या वतीने मंगलगेट येथे मारुती मंदिर समोर घंटा व थाळी वाजवून आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात व्यापारी आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष विलास गांधी, अनिल गट्टाणी, राजेंद्र गीते, श्याम जाखोटिया, अभिषेक दायमा, बद्री राठी, निकीत खटोड, योगेश जाजू, पारप्पा हरबा, रोहन गट्टाणी, अशोक खीचुसरा आदि सहभागी झाले होते. संपूर्ण राज्यातील संत-महंत,

धर्माचार्य, आचार्य, धार्मिक, अध्यात्मिक व सांप्रदायिक क्षेत्रातील मंडळी मंदिर व इतर धार्मिक स्थळे सुरु करण्याची राज्य सरकारकडे वारंवार मागणी करीत आहे. नागरिकांना देखील मंदिर व धार्मिक स्थळात जाण्याची इच्छा असून, देखील त्यांच्यासाठी मंदिराचे दारे बंद आहेत.

या धार्मिक स्थळाद्वारे मनुष्याचे आत्मबळ वाढून, मानसिक शांती व समाधान मिळत असते. या संकटकाळात नागरिकांना याची देखील गरज आहे. तसेच देवस्थान, तीर्थक्षेत्राशी निगडीत असलेले व्यवसायिकांपुढे आर्थिक प्रश्‍न निर्माण झाला आहे. धार्मिक स्थळांशी अनेक व्यापर व उद्योगधंदे देखील जोडलेले असून,

त्यांचे अर्थचक्र देखील बंद पडले आहे. एकीकडे मॉल व दारू दुकाने यांना परवानगी देऊन ते सुरु करण्यात आले आहे. अर्थकारणाला चालना देण्यासाठी मंदिरे व धार्मिक स्थळे देखील उघडण्याची गरज आहे. देशातील प्रमुख धर्मस्थळे दर्शनासाठी खुली झाली आहे.

तरी राज्य सरकारने या गोष्टींचा विचार करुन त्वरीत धार्मिक स्थळे उघडण्याची मागणी भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी अहमदनगर शहर व जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News