अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-भिंगारमध्ये अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या आहे. हा प्रश्न सोडविण्याची मागणी भिंगारकरांनी मनपाकडे केली आहे. मुळा धरणात पाणी मुबलक असले तरी शहरालाच पाण्याची टंचाई भासत आहे.
पाणी प्रश्नामुळे नागरिक हैराण झाले होते. अखेर या प्रलंबित पाण्याचा प्रश्न भाजप युवा माेर्चाच्या आंदोलनानंतर मार्गी लागला. भिंगार शहरातील वाघस्करगल्ली, दाणेगल्ली, डपकरगल्ली भागात अनेक वर्षांपासून नळांना पाणी येत नसल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत.
या परिसरातील नागरिक छावणी परिषदेची सर्व देयके वेळेवर भरत आहेत, तरीही नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. याबाबत भाजपच्या वतीने हा प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यासाठी आंदोलने केली. भाजप युवा मोर्चातर्फे शहराध्यक्ष किशोर कटोरे यांनी भिंगार छावणी परिषदेचे
मुख्याधिकारी विद्याधर पवार यांना १० नोव्हेंबरला पुन्हा निवेदन देऊन नवी पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू केले नाही, तर उपोषण करण्याचा इशारा दिला होता. मुख्याधिकारी पवार यांनी त्वरित काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार भिंगार शहरात नव्याने पाइपलाइन टाकण्यास प्रशासनाने मंजुरी दिली आहे..
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved