‘युरिया खत ८ दिवसांत न मिळाल्यास आंदोलन’

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 : शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना येत्या ८ दिवसांत मिळाले नाही, तर कृषी विभागाच्या कार्यालयासमोर शेतकरी आंदोलन करतील, असा इशारा जनशक्तीचे अध्यक्ष शिवाजी काकडे यांनी दिला.

तहसीलदार अर्चना भाकड व तालुका कृषी अधिकारी मरकड यांना युरिया खत त्वरित उपलब्ध करून द्यावेत म्हणून लेखी निवेदन देण्यात आले.

यावेळी जगन्नाथ गावडे, वसंत गव्हाणे, संदीप जाधव उपस्थित होते. काकडे म्हणाले, तालुक्यात युरियाची टंचाई जाणवत आहे.

येत्या आठ दिवसांत तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याला विनाअट युरिया उपलब्ध करून द्यावा; अन्यथा कृषी विभागासमोर शेतकऱ्यांचा मोठा मोर्चा दाखल होईल याची नोंद घ्यावी.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment