जिल्हा प्रशासनाकडून वाळू लिलावासाठीच्या हालचाली सुरु

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- जिल्हा प्रशासनाकडून अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांतर्फे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयात 23 वाळू घाटांचे प्रस्ताव मागील महिन्यात दाखल केले आहेत.

त्यानुसार जिल्ह्यातील मुळा, प्रवरा, गोदावरी नद्यांचे पाणी कमी होताच जिल्हा प्रशासनाने पात्रातील वाळू घाटांच्या लिलावासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. .

राहुरी, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव येथील तहसील कार्यालयांमध्ये नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पर्यावरणविषयक जाहीर लोकसुनावणी शासकीय नियमांचे पालन करून होणार आहे.

त्यानुसार 03 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता राहुरी येथे व दुपारी 03 वाजता श्रीरामपूर येथे, तसेच 05 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता राहता येथे आणि दुपारी 03 वाजता कोपरगाव

येथे तहसीलदार कार्यालयात पर्यावरणविषयक लोकसुनावणी होणार आहे. या ठिकाणी पार पडणार वाळू घाटांचा लिलाव राहुरी (मुळा व प्रवरा नदी)- पिंप्री वळण, राहुरी खुर्द, वळण, चंडकापूर, रामपूर व सात्रळ.

राहाता (प्रवरा नदी) – पुणतांबे व रस्तापूर. श्रीरामपूर (प्रवरा नदी) – वांगी खुर्द, नायगाव (क्रमांक एक व क्रमांक दोन), मातुलठाण (क्रमांक एक, दोन, तीन). कोपरगाव (गोदावरी नदी) – कोकमठाण, संवत्सर, कोळगाव थडी, जेऊर, सोनारी, पाटोदा, सांगवी भुसार, सुरेगाव व गोधेगाव.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved