नवरदेवासोबत हेलिकॉप्टरमधून उतरले खासदार कोल्हे…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :-  एरवी लग्न म्हटले कि वरात आणि वरातीमध्ये मुख्य आकर्षण म्हणजे घोड्यावर बसलेला नवरदेव हा असतो.

मात्र मोठे लग्न म्हंटले कि, गोष्टी देखील मोठ्मोठ्याचं होणार हे तर ठरलेलंच… अशाच जिल्ह्यातील एका लग्नाची गोष्ट सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे.

वडाळा बहिरोबा (ता. नेवासे) येथील प्रगतिशील शेतकरी विलास मोटे यांची कन्या प्रणोती व हवेली (जि. पुणे)

येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांचे चिरंजीव कार्तिक यांचा साखरपुड्याचा कार्यक्रम मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत व कोरोना नियमांचे पालन करत शुक्रवारी (ता. २) साध्या पद्धतीने पार पडला.

यावेळी वधूच्या घरासमोरील अंगणात वऱ्हाड येण्यापूर्वीच हवेली (जि. पुणे) येथील वराचे हेलिकॉप्टर आले.

त्यातून उतरलेल्या वराबरोबर होते खासदार डॉ. अमोल कोल्हे. आणि मग काय खासदार कोल्हे यांना पाहण्यासाठी नागरिकांनी एकच धावपळ केल्याचे दिसून आले.

दरम्यान कोरोना निर्बंधांमुळे कुटुंबातील सदस्यांसह १० ते १५ राजकीय व्यक्ती उपस्थित होत्या. हेलिकॉप्टरने आगमन वगळता संपूर्ण कार्यक्रम साध्या पद्धतीने पार पडला, असे मुळा कारखान्याचे उपाध्यक्ष भाऊसाहेब मोटे यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe