अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :- शेतकऱ्यांच्या भावना, संवेदना लक्षात घेऊन आम्ही काम करतो.महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे प्रकार खपवून घेणार नाही, असा इशारा ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला.
मंत्री तनपुरे हे शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते घनश्याम शेलार,
महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता दीपक लहामगे, किसन कोपनर आदी उपस्थित होते. मंत्री तनपुरे म्हणाले, गेल्या काही वर्षांत शेतीचा लोड वाढला,
त्या प्रमाणात महावितरणचे इन्फ्रास्ट्रक्चर वाढले नाही, पायाभूत सुविधांची कामे झाली नाहीत. त्यामुळे फिडर आिण सबस्टेशन ओव्हर लोड झाले.महावितरण अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे चुकीची कामे होत आहेत. यावर गेल्या काही वर्षांत जरब बसला नाही.
हे होण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागते, ती यापूर्वी दिसली नाही, अशी टीका त्यांनी केली. आता हे चित्र बदलत आहे, असे तनपुरे म्हणाले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम