ग्रामीण भागात शिवसेनेची विजयाची मुसंडी !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-  शेवगाव तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, त्यामध्ये तालुक्यातील ग्रामीण भागातील शिंगोरी, अधोडी, मळेगाव शे, हसनापूर, वाडगाव, ढोरजळगाव ने, नजीक बाभुळगाव, लखमापुरी, राक्षी, भावीनिमगाव, नागलवाडी, वरखेड,

गदेवाडी, हातगाव, कांबी, चापडगाव, अशा अनेक गावांत शिवसेनेचे ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक उमेदवार निवडून आले आहेत.

हे सदस्य ग्रामपंचायतमध्ये निवडून आल्यामुळे ग्रामीण भागात शिवसेनेने चांगलीच मुसंडी मारली आहे. शेवगाव तालुक्यात यापूर्वी शिवसेनेचा एकही ग्रामपंचायत सदस्य निवडून आलेला नव्हता. मात्र पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेने वरील गावांत बरेचशे उमेदवार निवडून आणून पुढील राजकारणाची चुणूक दाखवली.

या ग्रामपंचायत निवडणुकीचा शेवगाव नगरपरिषदेच्या होणाऱ्या निवडणुकीवर परिणाम होईल, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे शेवगाव तालुकाप्रमुख ॲड. अविनाश मगरे यांनी दिली.

ग्रामीण भागातील निवडून आणलेल्या सदस्यांचे व कार्यकर्त्यांचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय धाडी, विधानसभा संपर्कप्रमुख नंदकुमार मोरे, जिल्हाप्रमुख दक्षिण विभाग राजेंद्र दळवी, तालुकाप्रमुख ॲड.अविनाश मगरे, शहरप्रमुख सिद्धार्थ काटे सर, शीतल पुरनाळे,

pमहेश पुरनाळे, सुनील जगताप, उदय गांगुर्डे, गणेश पोटभरे, मधुकर कराड, सोमनाथ पाटेकर, तनवीर पठाण, महेश मिसाळ, अरुण काटे, अशोक गवते, कानिफ कर्डिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment