अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- नगर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच आरक्षणाची सोडत आज गुरुवार दि. २८ रोजी प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
न्यू आर्टस कॉलेजमधील राजश्री शाहू महाराज सभागृहात सकाळी ११ वाजता अगामी २०२५ च्या मुदतीसाठी तालुक्यातील सरपंचपदाचे आरक्षण या सोडतीद्वारे निश्चित होणार असल्याची माहिती तहसीलदार उमेश पाटील यांनी दिली.
सन २०२१ ते २०२५ च्या कालावधीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सरपंच आरक्षण निर्धारीत करण्यात येत आहे.
याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आदेशित केल्याप्रमाणे नगर तालुक्यातील ग्राम पंचायत सरपंच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम नगर तहसील प्रशासनाने आज आयोजित केला आहे.
नगर उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या अध्यक्षतेखाली आज गुरुवारी सोडतीची प्रक्रिया संपन्न होणार आहे. तरी ग्रामपंचायत आजी -माजी पदाधिकारी,
जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य आणि नागरिकांना या सोडत प्रक्रियेस उपस्थित राहण्याचे आवाहन नगर तहसीलदार उमेश पाटील यांनी केले आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved