नामदार शंकरराव गडाखांना भरदुपारी भूक लागली आणि त्यानंतर….

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :- जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख हे दोन दिवस उस्मानाबाद दौऱ्यावर होते. हा दौरा आटोपून अहमदनगरकडे परत जात असताना त्यांनी एका बंद असलेल्या धाब्यावर जेवण केले.

विशेष म्हणजे कॅबिनेट मंत्री असून गडाख यांनी स्वतः कडील जेवणाचा डबा उघडून खाटेवर बसून जेवण केले. याबाबतचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सर्वसामान्यांप्रमाणे वागणेबोलणे, सहज कुठेही मिळुन मिसळून जाणे यासाठी राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख ओळखले जातात. मंत्रीपदी असले तरी त्याचा बडेजाव न करता ते आपले काम करीत असतात.

आज उस्मानाबाद येथील स्वातंत्र्य दिन सोहळा आटोपून अहमदनगरला परतताना दुपारी भूक लागली व गडाखांनी आपला ताफा एका बंद ढाब्यावर थांबवला.

साध्या ढाब्यावर बाहेर असलेल्या बाजेवर बैठक मारून त्यांनी उस्मानाबादकरांनी दिलेला घरचा डबा उघडून जेवण केलं. त्यांच्या या साधेपणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गडाख हे कॅबिनेट मंत्री जरी असले तरी त्यांनी त्यांच्यातील साधेपणा उपस्थितांना भावला. जेवताना त्यांनी उपस्थित लोकांशी काही विषयांवर चर्चा देखील केली.

ॲड.सतीश पालवे यांनी सोशल मिडियात पोस्ट लिहून मंत्री गडाख यांच्या या साधेपणाचा आखो देखा हाल अतिशय सुंदर शब्दांत व्यक्त करून उस्मानाबादकरही पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या साधेपणाच्या प्रेमात पडले असल्याचे नमूद केले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment