अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- अहमदनगर शहरातील प्रलंबित असलेला उड्डणपुलाचे काम लवकरच सुरु होणार असल्याने या उड्डाणपुलास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी यशस्विनी महिला ब्रिगेडतर्फे करण्यात आली आहे.
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने मनपा उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, जिल्हाधिकारी कार्यालय व राष्ट्रीय महामार्ग कार्यालयास निवेदन दिले.
यावेळी यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे, मनिषा गायकवाड, रोहीणी पवार, जया वाळेकर, रोहिणी वाघीरे आदी उपस्थित होत्या.
नगर शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा व नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला उड्डाणपुल सर्वपक्षीय नेत्यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेला आहे.
लवकरच या पुलाचे काम सुरु होण्यास मंजुरी मिळालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी व्यापाराला चालना दिली.
त्यांच्या अनेक आठवणी शहराशी जुडलेल्या आहेत. यामुळे या पुलास छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल असे नाव देण्याची मागणी यशस्विनी महिला ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा