अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : शहरासह उपनगर भागातील बचत गटाच्या महिलांनी खाजगी फायनान्सकडून कर्ज घेतले असताना, लॉकडाऊन काळात उत्पन्नाचे साधन नसल्याने त्याचे हप्ते भरण्यात आलेले नाही.
महिलांकडून कर्जाचे हप्ते वसूल करण्यासाठी खाजगी फायनान्सवाले गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून दमबाजी करीत असून, या खाजगी फायनान्स धारकांवर गुन्हे दाखल करावे व लॉकडाऊन काळातील व त्यापुढील तीन महिन्यांचे कर्जाचे हप्ते माफ करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देऊन निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचीत यांच्याशी सदर प्रश्नी चर्चा करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हा शहर संघटक मतीन सय्यद, फातेमा शेख, अनिता पाचरणे, कल्पना सोनवणे, रीना पल्ले, आशा बांगडी, मनिषा भोसले, शाहीन शेख आदिंसह विविध बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.
अहमदनगर शहरासह भिंगार, आलमगीर, मुकुंदनगर, केडगाव, सावेडी, एमआयडीसी मधील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून खाजगी फायनान्स कडून विविध व्यवसायासाठी कर्ज घेतले होते. मात्र लॉकडाऊन काळात सर्व व्यवहार ठप्प असल्याने तीन महिन्यांचे हप्ते भरण्यात आलेले नाही. सध्या अनेक व्यवसाय व उद्योगधंद्यांना परवानगी देण्यात आली असली तरी सर्व व्यवसायामध्ये मंदिचे सावट आहे.
कर्ज घेणार्या महिलांची आर्थिक परिस्थिती गंभीर असून, त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे देखील जड जात आहे. सर्व कामकाज ठप्प असल्याने पुढील तीन महिने व्यवहार सुरळीत होणार नसल्याची चिन्हे आहेत.
खाजगी फायनान्सवाले कर्जाचे हप्ते वसूल करण्यासाठी महिलांकडे गुंड प्रवृत्तीचे लोक पाठवून त्यांना दमबाजी केली जात आहे. तर घराला टाळे मारण्याची भाषा वापरली जात असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
तरी प्रशासनाने अशा खाजगी फायनान्सवाल्यांवर गुन्हे दाखल करुन त्यांच्यावर कारवाई करावी, अशा तक्रारी घेऊन येणार्या महिलांची फिर्याद घेऊन संबंधीतांवर गुन्हे दाखल व्हावे, लॉकडाऊन मधील तीन व लॉकडाऊनच्या नंतरचे तीन असे एकूण सहा महिन्यांचे कर्जाचे हप्ते माफ करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
बचत गटातील महिलांकडून कर्जाचे हप्ते वसूल करण्यासाठी खाजगी फायनान्सवाले गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून दमबाजी करीत असून, सदर खाजगी फायनान्स धारकांवर गुन्हे दाखल करावे व लॉकडाऊन काळातील व त्यापुढील तीन महिन्यांचे कर्जाचे हप्ते माफ करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हा शहर संघटक मतीन सय्यद, फातेमा शेख, अनिता पाचरणे, कल्पना सोनवणे, रीना पल्ले, आशा बांगडी, मनिषा भोसले, शाहीन शेख आदि.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews