राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पारनेर युवक तालुकाअध्यक्ष पदी लकी कळमकर यांची निवड

राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पारनेर युवक तालुकाअध्यक्षपदी लकी भाऊसाहेब कळमकर यांची निवड करण्यात आली आहे. आमदार निलेश लंके व माजी आ. दादाभाऊ कळमकर यांच्या शिफारसीने ही निवड करण्यात आली.

मुंबईमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार प्रदेश कार्यालयात महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष जयंतराव पाटील व राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महेबूबभाई शेख यांनी ही निवड केली.

या निवडीचे नियुक्तिपत्रक त्यांना देण्यात आले. यावेळी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख व पारनेर तालुक्यातील युवक कार्यकर्ते उपस्थित होते. लकी कळमकर यांच्या या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.