Ahmednagar News : निसर्गाचा कोप झाला ! तीव्र दुष्काळी परिस्थिती, एकही शेतकरी जिवंत राहणार नाही….

Published on -

Ahmednagar News : पाथर्डी शेतकरी संकटात सापडलेला आहे. निसर्गाचा कोप झाला आहे. तालुक्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती उद्भवली असून, शासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा भगवानराव दराडे यांनी दिला आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने सुरू असलेल्या होऊन ‘जाऊ दे चर्चा’ या कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील मोहटा, करोडी, कारेगाव, चिंचपूर येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन चर्चा केली, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्यावर दराडे यांनी शासनाला हा इशारा दिला.

यावेळी बोलताना भगवानराव दराडे म्हणाले की, लम्पी आजाराने शेतकऱ्यांकडे जनावरे राहिली नाहीत, जी थोडीफार जनावरे शिल्लक आहेत, त्यांना खायला चारा नाही, पाजायला पाणी नाही.

यावर्षी पाथर्डी तालुक्यात अनेक ठिकाणी पाऊस झालेला नाही, पिके वायाला गेली आहेत, विहिरी कोरड्या आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी हलाकीचे जीवन जगत आहे. शासनाने या उद्भवलेल्या तीव्र दुष्काळी परिस्थितीवर त्वरित उपयोजना कराव्यात,

चारा डेपो, पाण्याचे टँकर गावागावात सुरू करावेत, अशी शिवसेनेची शेतकऱ्यांमार्फत शासनाला विनंती आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी या सरकारकडे काय आहे ? शेतकरी पेरणी, मशागत, खते वापरून होते ते पैसे खर्च करून बसलेत, आज मजूर लावायलासुद्धा यांच्याकडे पैसे नाहीत, परिस्थिती अशी आहे.

अशा एकेक कुटुंबाला जर इतके वाईट दिवस आले उद्या एकही शेतकरी जिवंत राहणार नाही सरकारने या शेतकऱ्याला भरपाई द्यावी, अशी आमची शिवसैनिकांची मागणी आहे.

नाहीतर आम्हाला शेतकऱ्यांना बरोबर घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल. शासनाने त्वरित उपयोजना कराव्यात, अशी आमची शेतकऱ्यांमार्फत मागणी आहे, असे दराडे म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe