पारनेर तालुक्यात राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत आमदार लंके ….

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- ग्रामपंचायत बिनविरोध निवडणुकीचे प्रनेते समजले जाणारे आमदार निलेश लंके यांनी पारनेर तालुक्यातील ८८ जागांपैकी ७० जागांवर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व मिळवत मतदार संघासह महाराष्ट्रात अनोखे वेगळेपण निर्माण केले.

एकुण८८ ग्रामपंचायत पैकी राष्ट्रवादी काँग्रेसला ७० ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व मिळवता आले तर संमिश्र स्वरूपात सहा ग्रामपंचायत असून इतर पक्ष १० ग्रामपंचायती पैकी किमान पाच ते सहा ग्रामपंचायत या निकाल लागल्यानंतर आमदार लंके यांच्या संपर्कात आले आहेत, असे लंके समर्थकांकडून बोलले जात आहे .

पैकी भा.ज.पा.ला अवघ्या दोन ग्रामपंचायतीवर समाधान मानावे लागले आहे. पारनेर तालुक्यातील ८८ ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी सोमवारी पारनेर तहसील कार्यालय येथे पार पडली, निवडणूक जाहीर झाल्या पासून आमदार लंके हे गावोगावी बैठका घेत अनेक पुढारी व गावकाभाऱ्यांच्या भेटीगाठी घेत बिनविरोध निवडणूकीचे आवाहन करत होते.

त्यांना प्रतिसादही चांगल्या प्रमाणात मिळाला व त्याचाच प्रत्यय आज पाहावयास मिळाला.व पारनेर तालुक्यात राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत आमदार लंके यांनी आपल्या कार्यकुशल नेतृत्वाची झलक दाखवून दिली .

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment