पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याची 75 व्या अधीमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली व या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थितांना मंत्री विखे पाटील यांनी मार्गदर्शन केले.
या मार्गदर्शना वेळी बोलताना त्यांनी निळवंडे धरणाच्या प्रश्नावरून म्हटले की, निळवंडे धरणाचा जो काही प्रश्न होता त्यावरून केवळ आमची बदनामी करण्याचा प्रयत्न आमच्या शेजारच्या मित्रांनी केलापरंतु धरणातून पाणी देण्याचे काम हे विखे कुटुंबियांनीच केले व त्याचे पुण्य देखील विखे कुटुंब यांनाच मिळाले असे उद्गार त्यांनी काढले. यावेळी बोलताना त्यांनी अप्रत्यक्षपणे नाव न घेता बाळासाहेब थोरात यांच्यावर देखील निशाणा साधला.
निळवंडे धरणाच्या प्रश्नावरून आमची बदनामी शेजारच्या मित्रांनी केली– मंत्री राधाकृष्ण विखे
निळवंडे धरणाच्या प्रश्नावरुन केवळ आमची बदनामी करण्याचा प्रयत्न आमच्या शेजारच्या मित्रांनी केला; पण धरणातून पाणी काढण्याचे पुण्य हे विखे कुटूंबियांनाच मिळाले. स्वतःला जलनायक म्हणून घेणाऱ्यांनीच समन् यायीचे भुत जिल्ह्याच्या मानगुटीवर बसवून खलनायकाची भूमिका बजावली. सात वर्षे महसूलमंत्री राहूनही जिल्ह्याच्या हिताचा एकही निर्णय त्यांना घेता आला नाही.
जिल्ह्याच्या विकासासाठी मी केलेली ५० कामे दाखवतो, तुमचे एक तरी काम दाखवा, असे थेट आव्हान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.पदाश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या 75 व्या अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन करताना मंत्री विखे पाटील बोलत होते, कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे यांच्णा अध्यक्षतेखाली झालेल्या सभेस माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, डॉ. भास्करराव खर्डे, सतिय ससाणे, मच्छिद्र थेटे, नंदू राठी, आण्णासाहेब कडू, शांतीनाथ आहेर,
चेअरमन गिताताई भेटे, कार्यकारी संचालक महेश कोनापुरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. सभेमध्ये ऊस उत्पादक शेतकयांसाठी मंत्री विखे पाटील यांनी आधी जाहीर केलेल्या ३ हजार रुपयांच्या भावामध्ये अधिकचे २०० रुपये देण्याची घोषणा केली. मंत्री विखे पाटील म्हणाले की, कारखान्याच्या 75 वर्षाच्या यशस्वी वाटचालीचे श्रेय ऊस उत्पादक शेतकरी, सभासद आणि कामगारांचे आहे,
कारखानदारीने अनेक संक्रमणे पाहिले, आवानांवर मात केली; परंतु सहकार चजवळ टिकवून ठेवण् याच्या विचाराने आजपर्यंत झालेली यशस्वी वाटचाल ही खऱ्या अर्थाने पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखेंच्या विचारांचे फलित असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने साखर स्वीकारखानदारीला पाठबळ देण्यासाती मंत्रालय स्थापन केले.
कारखान्यांवर लावलेला १० हजार कोटी रुपयांचा आयकराचा बोना कायमस्वरुपी माफ केला. या निर्णयाचे संपूर्ण श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सहकारमंत्री अमीठ शाह यांनाच यागे लागेल, असे त्यांनी ववर्जुन नमुद केले.पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळविण्यासाठी महायुती सरकारने आता सव्र्व्हेक्षणाचे काम हाती घेतले आहे. यासाठी ६२ कोटी रुपयांची तरतुद यासाठी केल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
अगामी एक ते दोन वर्षांत हे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात वळवण्याची ग्वाही त्यांनी दिली. सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने विषय पत्रिकेवर असलेल्या सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. निळवंडे कालव्यातून पाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव उपस्थित सभासदांनी टाळ्याच् या गजरात मंजूर केला.