जिल्ह्यात ४५ हजार ३३४ मतदारांची नव्याने नोंद

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. दरम्यान प्रशासनातर्फे २५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो.

या अनुषंगाने १७ नोव्हेंबरपासून विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला होता. १ जानेवारी २०२१ रोजी ज्यांचे वय १८ वर्षे पूर्ण झाले आहे, अशांचे मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.

१ जानेवारी २०२१ रोजी १८ वर्षे पूर्ण झाल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. त्यामुळे जिल्ह्याची मतदारसंख्या आता ३५ लाख ४ हजार ७७ इतकी झाली आहे.

जिल्ह्यात नव्याने ४५ हजार ३३४ मतदारांची नोंद झाली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये या नव्या तरुण मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment