अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :- कोरोनामुळे गेली अनेक महिने बंद असलेले शिर्डी येथील साईबाबांचा दरबार आता पुन्हा एकदा खुला झाला आहे. दर्शनासाठी आतुरलेल्या भाविकांकडून देखील शिर्डी येथे गर्दी केली जाऊ लागली आहे.
नुकतेच शिर्डी संस्थानाने नाताळच्या सुट्ट्यांमध्ये गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन साई दर्शनासाठी नवी नियमावली जारी केलीय. दर्शन पास काऊंटरवर गर्दीच्या काळात मिळणार नाही.
साई भक्तांना संस्थानाच्या वेबसाईटवर पास आरक्षित करावा लागणार आहे. मार्गदर्शक सूचनांचं पालन करून गर्दीच्या काळात जास्तीत जास्त १२००० साईभक्तांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देणे शक्य होणार आहे.
सशुल्क दर्शनपास आरक्षण केल्यापासून ५ दिवस आणि मोफत दर्शनपास आरक्षण तारखेपासून दोन दिवसांसाठी उपलब्ध असेल. ऑनलाईन पासशिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.
संस्थानच्या वेबसाईटवरून दर्शन पास घेणे अनिवार्य असणार आहे. या मंदिरामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका दिवसात दररोज सहा हजार साईभक्तांना दर्शनाचा लाभ दिला जात होता.
त्यानंतर दररोज साधारणपणे आठ ते नऊ हजार साईभक्तांना दर्शनाचा लाभ मिळावा, यादृष्टीने शिर्डी संस्थानने नियोजन सुरू केले होते
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- शेतात, घरात साप निघाला ? पकडू नका अन्यथा होईल 7 वर्षांची शिक्षा
- ‘असे’ लावा आपल्या मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर; होईल खूप कमाई
- एलआयसीची भन्नाट योजना ! एकदाच भरा पैसे आणि दर महिन्याला मिळवा 5 हजार रुपये