अहमदनगर :- कार उत्पादन क्षेत्रात नावाजलेल्या टोयोटा आणि सुझुकी कंपनीच्या संयुक्त विद्यमानाने निर्माण करण्यात आलेल्या नवीन टोयोटा ग्लॅन्झाचे नगर-पुणे महामार्ग, केडगाव येथील वासन टोयोटा शोरुममध्ये वासन उद्योग समुहाचे चेअरमन विजय वासन, शोरुमचे जनक आहुजा, टोयोटा कंपनीचे एरिया मॅनेजर (महाराष्ट्र व गोवा) सुजीत नायर व वासन टोयोटाचे सीईओ सुरेंद्र पुजारी यांच्या हस्ते पहिल्या गाडीचे वितरण सौ.रचना आचार्य व मंदार आचार्य यांना करण्यात आले.
यावेळी अनिश आहुजा, दीपक जोशी, गौरव चव्हाण, कुलदीप भाटिया आदि उपस्थित होते.
टोयोटा आणि सुझुकी यांचे जागतिक पातळीवर कोलॅब्रेशन झाले आहे. हे कोलॅब्रेशन फक्त ग्लॅन्झा कार पुरते मर्यादित नसून यापुढे देखील टोयोटा आपली जगप्रसिद्ध हायब्रीड इलेक्ट्रिक कारची टेक्नॉलॉजी तर सुझुकी आपल्या छोट्या कार शेअर करणार आहेत.
नवनवीन कल्पनांना चालना देत टोयोटाने ग्लॅन्झा ही नवीन कार ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या समृद्ध वैशिष्ठयांसह बाजारपेठेत दाखल केली आहे. 1.2 लिटर पेट्रोल इंजनची ग्लॅन्झा कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक या दोन्ही व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे.
एकूण 2 एसआरएस एअरबॅग्ससह यापूर्वी कधीही न अनुभवलेली सुरक्षा, अद्ययावत एबीएस, ईबीडी, ब्रेक अस्सिस्ट, इलेक्टिरिकल आडजेस्टेबल ओआरव्हीएमसह टर्न इंडिकेटर, आयसोफिक्स, 7 इंच टचडिस्प्ले सह ऍपल कार प्ले आणि अॅन्ड्रॉईड ऑटो सुविधा, रिव्हर्स पार्किंग सेन्सर आणि कॅमेरा यांसारख्या आधुनिक सुविधांमुळे टोयोटा ग्लॅन्झा ग्राहकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे.
तसेच या कारसाठी 3 वर्षाची किंवा 1 लाख कि.मी. ची वॉरंटी आणि 24 बाय 7 फ्री रोडसाईड असिस्टेंस सेवा 3 वर्षासाठी कंपनीने उपलब्ध करुन दिली आहे. ही नवीन ग्लॅन्झा कार टेस्ट ड्राईव्हसाठी शोरुममध्ये उपलब्ध करुन देण्यात आली असून, कारप्रेमी ग्राहकांची या कारसाठी मागणी वाढत असल्याची माहिती अनिश आहुजा यांनी दिली.
- Infosys Share Price: इन्फोसिसच्या शेअरमध्ये मोठा चढउतार! गुंतवणूकदार गोंधळात… बघा सध्याची स्थिती
- SBI Share Price: एसबीआयच्या शेअरमध्ये मोठी पडझड! पटकन वाचा फायद्याची अपडेट, नाहीतर…
- Mobikwik Share Price: ई-कॉमर्स कंपनीच्या शेअरने 1 महिन्यात दिला 13.75% चा परतावा… आज बंपर तेजीत
- JK Tyres Share Price: जेके टायर्स शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या! किमतीत झाली मोठी वाढ…बघा ताजे अपडेट
- वोडाफोन- आयडिया शेअरच्या किंमतीत तेजीचे संकेत? BUY करावा का? बघा सध्याची ट्रेडिंग पोझिशन