अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- शेती घेण्यासाठी माहेरून पाच लाख रूपये आणावेत. यासाठी सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या शारीरिक मानसिक त्रासास कंटाळून तसेच माहेरच्या लोकांशी फोनवरून बोलून न दिल्याच्या कारणावरून नवविवाहित तरूणीने विहिरीत उडी मारून जीवनयात्रा संपवण्यासाठी खळबळजनक घटना शनिवारी जामखेड तालुक्यात घडली आहे.
या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला शनिवारी सायंकाळी हुंडाबळीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या तिघा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी मयत विवाहित तरूणीच्या पतीस पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,
जामखेड तालुक्यातील सटवाई जवळके येथील राधा खोसे (वय १९)असे मयत नवविवाहित तरूणीचे नाव आहे. मयत नवविवाहित तरूणीचे तीन महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर मयत विवाहित तरूणीच्या सासरच्या लोकांकडून नवीन शेती विकत घेण्यासाठी माहेर पाच लाख रूपये आणावेत.
यासाठी तगादा लावण्यात आला होता. मुलीचे वडील अंगद सुरवसे यांनी गरिबीची परिस्थिती असल्याने पाच लाख रुपये देण्यास असमर्थता दाखवल्याने मयत विवाहितेस सासरच्या मंडळींकडून त्रास देण्यास सुरवात झाली होती. तिला शाररिक मानसिक त्रास दिला जात होते. मयत मुलीस माहेरच्या लोकांशी फोनवर बोलू दिले जात नसायचे.
याच रागातून व सासरच्या लोकांकडून होत असलेल्या जाचास कंटाळून मयत राधा खोसे हीने शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास बबन उत्तरेश्वर खोसे यांचे शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली असे मयताचे वडील अंगद सौदागर सुरवस (वय -६० रा- गोसावीवाडी डोंजा ता.परांडा जि.उस्मानाबाद) यांनी जामखेड पोलिस स्टेशनला दाखल
केलेल्या फिर्यादी म्हटले आहे. त्यानुसार शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जामखेड पोलिस स्टेशनला मयत तरूणीचा पती भरत हनुमंत खोसे, सासरा हनुमंत खोसे, सासु महानंदा हनुमंत खोसे (सर्व रा.जवळके) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरत हनुमंत खोसे याला पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेत अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश कांबळे हे करत आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved