श्रीगोंदे | मैत्रिणीसमवेत क्लासला जात असताना सतरा वर्षांच्या विद्यार्थिनीचे अपहरण झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. बारावीच्या वर्गात शिकणारी ही युवती मैत्रिणीबरोबर दौंड रस्त्याने क्लासला जात असताना पाठीमागून पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ आली. एकाने खाली उतरून विद्यार्थिनीला बळजबरीने गाडीत बसवले. मैत्रिणीसह अन्य विद्यार्थिनींनी आरडाओरडा केला.
तथापि, आजूबाजूच्या नागरिकांना काही समजण्याच्या आतच स्कॉर्पिओ कर्जतच्या दिशेने गेली. पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत सर्व रस्त्यांवर नाकाबंदीचे आदेश दिले. स्कॉर्पिओचा क्रमांक मिळालेला नाही. अपहरण झाले त्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, ज्या तरुणाने अपहरण केले आहे तो कोकणगाव येथील असल्याचे समजते. भरदिवसा युवतीचे अपहरण झाल्याने महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
- Share Market गुंतवणूकदारांची चांदी होणार ! एका शेअरवर थेट 40 रुपयांचा डिव्हीडंड देणार ‘ही’ कंपनी
- शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांना हे 3 स्टॉक बनवणार मालामाल ! मिळणार 53 टक्क्यांपर्यंत रिटर्न
- नोकरीचं टेन्शनचं राहणार नाही ! पोस्टाच्या ‘या’ योजनेतून दरमहा 61,000 रुपयांची कमाई होणार ! कशी आहे योजना ?
- ब्रेकिंग ! शिर्डीसह राज्यातील ‘या’ 17 नगरपालिकांवर आता SC कॅटेगिरीमधील महिला होणार नगराध्यक्ष, वाचा डिटेल्स
- Share Market मधील गुंतवणूकदारांना कमाईची सुवर्णसंधी ! ‘या’ महिन्यात 3 कंपन्या देणार Dividend