धुळे : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची वाटचाल पराभवाकडे होत आहे. पराभवाचे खापर आपल्या माथी फुटू नये म्हणून काँग्रेस नेते राहुल गांधी बँकॉकला निघून गेले आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने आपल्या सत्ता काळात जनतेशी खोटारडेपणा केला. विकासाला खरी दिशा पंतप्रधान मोदींनी दिली आहे, असेही ते म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ धुळे जिल्ह्यात शिरपूर, साक्री आणि नेर येथे बुधवारी झालेल्या सभेत मुख्यमंत्री बोलत होते. त्यांनी या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली. ते म्हणाले, काँग्रेस पक्ष १५ वर्षांत जे करू शकला नाही, ते युती सरकारने अवघ्या ५ वर्षांत करून दाखवले. गेल्या ५ वर्षांत केंद्र व राज्यातील सरकारवर विरोधक एकही भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध करू शकले नाहीत.
महाराष्ट्रात ५० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असून शेवटच्या पात्र शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यंत कर्जमाफी योजना बंद केली जाणार नाही. आघाडी सरकारने सिंचनातून आपली तिजोरी भरली. पण युती सरकारने जलयुक्त शिवार अभियानासह विविध योजना राबवून राज्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण केले. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची वाटचाल पराभवाकडे होत आहे. पराभवाचे खापर आपल्या माथी फुटू नये म्हणून काँग्रेस नेते राहुल गांधी बँकॉकला निघून गेले आहेत.
- Tata Nexon CNG : टाटाने गुपचूप लॉन्च केली धमाकेदार कार ! दमदार मायलेज आणि स्टायलिश डिझाइन
- गौतम अदानी यांनी शेअर केला त्यांच्या यशाचा गुपीत मंत्र! नक्कीच जीवनात होईल फायदा
- Top 10 Stocks Today : इंट्राडेमध्ये नफा कमवण्यासाठी हे दहा शेअर आज खरेदी कराच
- सुझलॉन शेअर 42 टक्क्यांनी घसरला ! शेअर SELL करावा की BUY ? तज्ञांनी स्पष्टचं सांगितलं
- Gold Price Today : सलग दुसऱ्या दिवशी सोन झालं स्वस्त !