श्रीगोंद्यात रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू

Ahmednagarlive24
Published:

नगर : श्रीगोंदे तालु्क्यातील बेलवंडी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेतून पडून गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बुधवारी सकाळी ही घटना घडली. शतक मच्छिंद्र यादव (वय २०, रा. दुर्गळवाडी, ता. कोरेगाव, सातारा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

हुतात्मा एक्सप्रेस रेल्वे बुधवारी सकाळी बेलवंडी स्थानकात थांबली होती. यादव प्लॅटफॉर्मवर उतरला होता. रेल्वेत बसल्यानंतर काही वेळानंतर तो गाडीतून बाहेर पडला. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने गंभीर जखमी झाला होता.

बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. गंभीर जखमी झालेल्या यादव याला उपचारासाठी श्रीगोंदा येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment