जीवे मारण्याचा प्रयत्न,पाचपुते कुटुंबियांनमध्ये भितीचे वातावरण

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर : डोक्यात तब्बल दगडाचे चार वार करुन जीवे मारण्याची घटना नगर तालुक्यातील टाकळी काझी येथे दि.२१ऑक्टोंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर असे की, नगर जामखेड रोड वरील टाकळी काझी येथील पेट्रोलपंपासमोर सुनिल पाचपुते यांचे चहा व नाष्ट्याचे हॉटेल आहे.

दि.२१ ऑक्टोबर रोजी नेहमीप्रमाणे ते रात्री दहाच्या सुमारास हॉटेल बंद करुन बाहेर पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेले असताना साडे दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीचे पाचपुते यांच्या डोक्यात दगड मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या व्यक्तीच्या हातातून दगड खाली पडल्याने पाचपुते हे पळाल्याने त्यांचा जीव वाचला.

हा हल्ला चोरीच्या उद्देशाने झाला नसून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे पाचपुते कुटुंबियांचा आरोप आहे. याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात तक्रारीची नोंद केली आहे. मात्र या घटनेला दहा ते बारा दिवस उलटले मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्याने पाचपुते कुटुंबियांनमध्ये भितीचे वातावरण परसले असून, याबाबत तातडीने कार्यवाही न केल्यास कुटुंबासह उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment