कर्जत : पाहुण्यांचा सन्मान करण्याची आपली संस्कृती असून, बाहेरून आलेले पार्सल सन्मानाने परत पाठवा, असे आवाहन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांचे नाव न घेता केले. कर्जत तालुक्यातील राशीन गटात ना. शिंदे यांनी विविध गावांना भेटी देत ग्रामस्थाशी संवाद साधला, या वेळी ते बोलत होते.
वायसेवाडीत ना. शिंदेंसह भाजपा कार्यकर्त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. या वेळी कैलास कायगुडे यांनी, गेली सत्तर वर्षे रस्त्यापासून दूर असलेलं गाव ना. शिंदे यांनी मुख्य रस्त्याला जोडले. राष्ट्रवादीने १५ वर्षे सत्तेच्या काळात एकही काम केले नाही.

मनसेचे जिल्हाध्ययक्ष पदाचा राजीनामा देऊन भाजपात आलेले सचिन पोटरे म्हणाले, राम शिंदे चळवळीतले कार्यकर्ते असल्यामुळे आपली भावना त्यांना समजत होती, तालुक्यातील अस्मितेच्या प्रश्नांवर आपण ना. शिंदे यांना कायम धारेवर धरले व सर्वात जास्त विरोध आपणच केला. मात्र, त्यांनी कधी आपल्यावर वैयक्तिक राग काढला नाही व त्रासही दिला नाही.
मतदारसंघातील कामे पाहून आणि बारामतीचे होणारे अतिक्रमण थोपविण्यासाठी आपण भाजपात प्रवेश केला. शिंदे हे जादूगार असून, त्यांनी मतदारसंघात अमुलाग्र बदल केला आहे. आपण एसटी डेपोचा पाठपुरावा सोडणार नाही, पक्ष सोडावा लागला असला तरी तालुक्यातील प्रश्न सोडणार नाही, असेही पोटरे म्हणाले.
या वेळी ना. शिंदे म्हणाले, मी आपलाच माणूस असून, तुम्ही मला कामे सांगा, कारण तुमचा हक्क आहे. पाहुण्यांचा सन्मान करण्याची आपली संस्कृती असून, बाहेरून आलेले पार्सल सन्मानाने परत पाठवू.
गेल्या ६० वर्षांत मतदारसंघात कामे झाली नव्हती, आता व्हायला लागली आणि हे पार्सल इकडे आले आहे. बारामतीकरांना आपला विकास होऊ लागल्याचे पहावेना म्हणून त्यांनी येथे लढण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले. .
या वेळी सुरेश पावणे, गणपत पांडुळे, नवनाथ पडवळ आदींची भाषणे झाली. वायसेवाडी येथे अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
- एलपीजी गॅस एजन्सी सुरू करा, दर महिन्याला होणार लाखो रुपयांची कमाई ! एका सिलेंडर मागे किती कमिशन मिळते? पहा…
- पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) मध्ये गुंतवणूक करताना ‘या’ 7 टिप्स फॉलो करा ! आयुष्यभर पैशांचे टेन्शन राहणार नाही
- अकोले तालुक्यात बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी तालुका बाल संरक्षण समितीची स्थापना
- नेवासा तालुक्याती मंदिरातील टाळ चोरीचा गुन्हा पोलिसांनी २४ तासातच आणला उघडकीस, आरोपींना अटक
- शेतकऱ्यांनो! वास्तव स्वीकारून सात नंबर अर्ज भरा अन्यथा भविष्यात शेती धोक्यात येऊ शकते