जामखेड व सोलापूर रोड वरील जीवघेणे खड्डे बुजवा

Ahmednagarlive24
Published:

नगर-जामखेड रोड वरील चांदणी चौक ते चिचोंडी पाटील तर नगर-सोलापूर रोड वरील सोलापूर नाका ते दहिगाव साकत पर्यंन्त पावसाने रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून, ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे रस्त्यावर पडले आहे. यामुळे रस्त्यावर अनेक लहान-मोठे अपघात होत असून, तातडीने या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी जनाधार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

सदर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता एस.आर.गुंजाळ यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, दीपक गुगळे, सागर बोडखे, बाबासाहेब करांडे, श्रीपाद वाघमारे, मंगल मोटे, अमोल भजरे, अजय सोळंकी, सुशील नहार आदी उपस्थित होते. येत्या दहा दिवसात या दोन्ही रस्त्यावरील खड्डे न बुजविल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.              

नगर-जामखेड व नगर-सोलापूर रोडवर नेहमीच अवजड वाहनांची वाहतुक चालू असते. दोन्ही रस्त्यालगत असलेल्या गावातील नागरिक विविध कामासाठी शहरात येत असतात. पावसाने दोन्ही रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली असून, खड्डे चुकविण्याच्या नादात अनेक लहान-मोठे अपघात घडत आहे.

यापुर्वी देखील या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे. सदर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळोवेळी कळविण्यात आले असून, याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

दोन्ही रस्त्यांची दुरुस्ती करुन सारोळाबद्धी येथील पुलाला कठडे बसविणे व चिचोंडी पाटील ते भातोडी या नवीन झालेल्या रस्त्यावरील ड्रेनेज खड्डाला कठडे बसविणे व दोन्ही रोडच्या साईड पट्टया दुरुस्त करण्याची मागणी जनाधार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment