सुपा – नगर – पुणे रस्त्यावर सुपा शिवारात हॉटेल शिवनेरी समोर रस्त्याने पायी चाललेल्या अज्ञात इसमाला भरधाव वेगातील वाहनाने धडक देवून उडविले.
या अपघातात अनोळखी पुरुष जागीच ठार झाला. वाहन चालक आरोपी गाडीसह फरार झाला. हे.कॉ. सुनील कुटे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात वाहन चालक आरोपीविरुद्ध सुपा पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे.कॉ. कुटे हे अज्ञात वाहनाचा शोध घेत असून मयताची ओळख शोधत आहेत. नगर – पुणे रस्त्यावर अनेक अपघात होत असून वाहन चालक भरधाव वेगात वाहने चालवित असल्याने रस्त्यावरील अपघात वाढले आहेत.