अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणाने आता वेग घेतलाय. आगामी निवडणूक चांगल्याच जंगी होतील असे दिसत आहे. सध्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील खासदार डॉ. सुजय विखे यांनी चांगलंचंसंपर्क वाढवत तयारी सुरु केली आहे.
यात विशेष म्हणजे कधीकाळी एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू असणारे माजी आ. शिवाजी कर्डीले हे आता नेहमीच त्यांच्यासोबत दिसतायेत. आता खा. सुजय विखे यांच्यासमोरच कर्डीले यांनी भविष्यवाणी केली आहे.
पुढच्यावेळी सुजय विखे हे खासदार , मी आमदार व मोनिका राजळे मंत्री असणार असं ते म्हणालेत. निमित्त होते पाथर्डी येथे पोलिस वसाहत आणि पोलिस ठाणे इमारतीच्या भूमिपुजनाच्या कार्यक्रमाचे. यावेळी येथे कर्डिले यांनी केलेल्या भाषणाची चांगलीच चर्चा रंगली आहे.
उद्घाटनाचे कार्यक्रमातून शक्तिप्रदर्शनाचा धडाका
2024 च्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आतापासूनच सुरू झाल्याच चित्र आहे. सत्ताधारी आमदार आणि खासदारांनी विकासकामांच्या उद्घाटनावर भर दिला आहे. उद्घाटनाचे कार्यक्रमातून शक्तिप्रदर्शनाचा धडाका लावला जात आहे.
विखे पाटील हे नगर दक्षिण मतदारसंघातून खासदार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ ऑक्टोबररोजी शिर्डी दौऱ्यावर येत आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी मोठी गर्दी जमवण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यासाठी खासदार विखे व माजी आमदार कर्डिले यांना नगर दक्षिण पिंजून काढताना दिसत आहेत. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून कार्यकर्ते, अधिकारी व नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. विकासकामांच्या उद्घाटनाला राजकीय संवादाचे स्वरूप आले आहे.
उमेदवार पाहू नका , मोदींना पाहून मतदान करा : खा. विखेंचा सूर
लोकसभा निवडणुकीसाठी कोण तयार आहे आणि कोण नाही, हे पाहण्यापेक्षा नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्यासाठी आपण सर्वानी काम करावे असे आवाहन खा. विखेंनी केले.
परंतु यावेळी अनेकांची जरी भाषणे झाली असली तरी कर्डीले यांचे भाषण मात्र चर्चेचा विषय झाला आहे.
सुजय विखे हे खासदार , मी आमदार व मोनिका राजळे मंत्री असणार अशी भविष्यवाणीच त्यांनी करून टाकली आहे. आता मतदार याकडे कोणत्या दृष्टीने पाहतात हे देखील पाहणे गरजेचेच आहे.