महापालिकेने वसूल केला ‘इतक्या’ लाखांवर दंड

Published on -

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या २ हजार ७७१ एवढी झाली असून अहमदनगर शहरात रुग्णसंख्या वाढत चालली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी प्रशासन अनेक नियमावली केली आहे. याचाच एक भाग म्हणजे जिल्हा प्रशासनाने अहमदनगर शहरात गेल्या 4 जुलैपासून ३१ जुलैपर्यंत सायंकाळी सातपासून प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी 20 पथकांची नियुक्ती केली आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

पोलीस अधिकारी, कर्मचारी, महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी यांच्या संयुक्त पथकाने 4 जुलै ते 22 जुलै दरम्यान दोन लाख 56 हजार 670 रुपयांचा दंड वसूल केला.

पथकाने ही कारवाई तोफखाना व कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत केली आहे. तोफखाना व कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत या पथकांना फिक्स पॉइंट देण्यात आले आहेत.

या पथकाचे समन्वय अधिकारी म्हणून महापालिकेचे उपायुक्त प्रदीप पठारे काम पाहत आहे. तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत नेमणुकीस असलेल्या पथक क्रमांक 1 ते 12 यांनी एक लाख 80 हजार 400 रुपये दंड वसूल केला.

तसेच कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत कार्यरत असलेल्या पथक क्रमांक 13 ते 20 यांनी 76 हजार 270 रुपये दंड वसूल केला आहे. या 20 पथकांनी 19 दिवसांमध्ये दोन लाख 56 हजार 670 रूपये दंड वसूल केला आहे.

दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या २ हजार ७७१ झाली आहे. १ हजार ३८४ लोकांवर उपचार सुरु असून १ हजार ३३७ रुग्ण बरे झाले आहेत. तर ५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe